नाशिक येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तीन चार पाच डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. खरे तर हे संमेलन नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साहित्याचा कुंभमेळा प्रथमच नाशिकला भरतो आहे. त्यामुळे या संमेलनाच्या सुवर्णमय ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी नाशिककरांना भेटणार आहे.तसे हे साहित्य संमेलन मार्च महिन्यात होणार होते. परंतु कोरोनाच्या महाभयंकर लाटेने संमेलन थांबविण्यात आले.त्यामुळे साहजिकच साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी व सूक्ष्म नियोजनासाठी संयोजकांना भरपूर वेळ मिळाला. नाशिकचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत देखणे आणि चिरस्मरणीय होणार आहे.
या संमेलनाची तयारी आता अखेच्या टप्यात आली आहे. संमेलन यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी साधारणता चाळीस समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून लोकहितवादी मंडळ हे संमेलन यशस्वीकरण्यासाठी सिद्ध झाले आहे.साधारणतः या संमेलनाला महाराष्ट्र ,इंदोर,बडोदा,भोपाळ,बेळगाव,गोव्यासह भारतातून आणि जगभरातून मराठी भाषाप्रेमी येणार आहे.या संमेलनाच्या आखीवरेखीव नियोजनासाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणामध्ये कविवर्य कुसुमाग्रज नगरी उभारण्यात आली आहे. देशाच्या राज्य आरोग्य मंत्री नामदार डॉक्टर भारतीताई पवार व नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी व स्वागत अध्यक्ष नामदार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये सभामंडप उभारण्याच्या भूमिपूजनाचा समारंभ होऊन मुख्यसभामंडप आकार घ्यायला सुरुवात आली आहे.संमेलनाची कार्यक्रम पत्रिका छापून वाटपाला सुरुवात झाली आहे. या संमेलनामध्ये विशेषत: बाल,कुमार, युवा, तरुण आणि ज्येष्ठ अशा साऱ्याच नागरिकांचा मोठा सहभाग असणार आहे. या साहित्य संमेलनाचे पहिले वैशिष्ठे म्हणजे, थोर शास्त्रज्ञ ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक डॉ.जयंत नारळीकर स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष भूषवणार आहेत. हे असे पहिल्यांदाच होते आहे. त्यामुळे या संमेलनातून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यावर ते त्यांच्या अध्यक्षीय मनोगतातून भर देतील.त्यांचे अनुभवकथन या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. बालवयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा.याअनुषंगाने डॉ.जयंत नारळीकर प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहेत.
या संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वासराव पाटील यांच्या शुभ हस्ते होत असून याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कवी जावेद अख्तर यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच या संमेलनात सर्वांसाठी विविध उपक्रमांची रेलचेल आहे. नाशिकला बारा वर्षांनी कुंभमेळ्याची पर्वणी असते. मला वाटतं तशीच साहित्याची पर्वणी नाशिकला तिसऱ्यांदा मिळते आहे. त्यामुळे नाशिककरांच्या आनंदामध्ये अधिकच भर पडणार आहे .गेल्या दोन महिन्यापासून पुन्हा वेगाने सर्व समित्यांचे कामकाज सुरू आहे. संमेलनापूर्वीचे काम आणि संमेलनातील काम त्यानुसार या समित्यांचे गट पाडून कामकाजाची विभागणी विश्वासराव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.यासर्व समित्यांमधी काम करणार्याण लोकांची संख्या बघितली तर ती सातशेच्या आसपास आहे. स्वागताध्यक्ष नाम. भुजबळसाहेब, पंकज भुजबळ, रूपालीताई भुजबळ हे संमेलनाच्या तयारीसाठी फार वेळ देत आहेत. हे संमेलन अतिशय आदर्श व्हावे, याची विशेष नोंद घ्यावी, अशा दृष्टिकोनातून हे साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी सारेच झटत आहे.संमेलनातबालकट्टा, कवीकट्टा, गझलकट्टा, निमंत्रितांचे कविसंमेलन, मुलाखती, परिसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रम आहे.या साहित्य संमेलनाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांची दु:स्थिती,आंदोलने,राजसत्तेचा निर्दयीपणा,या संदर्भात लेखक व कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका.या विषयावर विशेष परिसंवाद रंगणार आहे.या परिसंवादांमध्ये शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू सहभागी होणार आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या,तसेच शेतकऱ्यांच्या सद्यस्थिती संदर्भातील परिसंवाद मराठवाड्याचे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली होतो आहे. त्यात शेतकरी कार्यकर्ते प्रा.शेषराव मोहिते, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव,श्रीमंत माने, रमेश जाधव, विलास शिंदे सहभागी होणार आहे. या संमेलनाचे सारेच काम सारेच कार्यकर्ते प्रामाणिकपणे करत आहे.
या संमेलनामध्ये नाशिकचा इतिहास मांडला जाणार आहे. हे एक विशेष या संमेलनाचे ठरणार आहेत. यापूर्वी अ.भा.मराठीचं पहिलं साहित्य संमेलन १९४२ साली, दुसरं साहित्य संमेलन २००५ साली तर तिसरं संमेलन हे ३,४,५डिसेंबर २०२१ ला संपन्न होत आहे. त्यामुळे तिसरे संमेलन हे अत्यंत अविस्मरणीय ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या संमेलनामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र आणि त्यांच्या साहित्याच्या चाळीस खंडांचे प्रकाशन होणार आहेत. साहित्यकृतींची विक्री होण्यासाठी सर्वसाधारणपणे दोनशेच्या आसपास पुस्तक विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची पुस्तक विक्रीतून उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रदीर्घ काळ थांबलेला रसिक, वाचक आणि श्रोता या सगळ्यांना स्वच्छ, सुंदर विचारांचे दर्शन होणार आहेत. त्यामुळे या साहित्य संमेलनाला वेगळी झळाळी येणार आहे. नाशिक शहरातून उपनगरातून संमेलनस्थळी येण्याजाण्यासाठी साधारणत: दिडशे बसेसची व्यवस्था केली आहे. हात दाखवा आणि गाडीत बसा. अशा तत्वावर या गाड्या फेऱ्या करणार आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी रसिक, वाचकांना, कलावंतांना, बालकांना आणि नागरीकांना येण्याजाण्याची मोफत व्यवस्था केली आहे. त्यामुळे कोणीही या संधीपासून दूर राहू नये, याची काळजी आयोजकांनी घेतली आहे. या संमेलनाचे प्रक्षेपण जगभर लाईव केले जाणार आहे.
तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमातून दिवंगत साहित्यिकांच्या चरित्रांचा उजाळा दिला जाणार आहे.नृत्य,चित्रपट,लोककला,नाटक,साहित्यिक अशा सर्व कलाप्रकारातून उजाळा देण्याचा प्रयत्न या संमेलनातून केला जाणार आहे. या संमेलनाचे गीतातून नाशिकच्या साहित्य परंपरेचा परिचय करून देण्याचे काम कवी प्रा. मिलिंद गांधी यांनी केले आहे .नाशिकचे तरूण संगीतकार संजय गीते यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. तसेच त्यांनी स्वतः गायलेले सुद्धा आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक नगरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वागताच्या कमानी उभारल्या जाणार आहे. रांगोळ्या काढण्यात येणार आहे. त्यातून येणाऱ्यांचे स्वागत करण्याचा विशेष प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. या संमेलनाच्या कविकट्टातून एक नवा उच्चांक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. आठ्ठेचाळीस तास कवितेचा महोत्सव साजरा होणार आहे. निमंत्रितांच्या कविसंमेलनात पन्नास ते साठ कवींचा सहभाग आहे. कवी श्रीधर नांदेडकर या निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.वेगवेगळे परिसंवाद रंगणार आहे. एकूणच हे संमेलन नाशिकचे आहे.त्यामुळे या संमेलनाला जिल्हाभरातून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. समारोपाला शरदरावजी पवार नाम. बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती लाभणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कविवर्य कुसुमाग्रज नगरी सजली आहे.जसजसे संमेलनाची तारीख जवळ येते आहे,तसतशी साऱ्याची उत्सुकता वाढते आहे.ढते आहे.
प्रा.लक्ष्मण महाडिक