इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मंदिरांमध्ये देणगी येण्याचे प्रमाण बऱ्यापैकी असते. पण ते मंदिर किती मोठे आहे, देवस्थान किती मोठे आहे, त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तिरुपती, शिर्डी, पद्मनाभस्वामी या मंदिरांमध्ये येणाऱ्या देणग्या मोठ्या असतात. इतर ठिकाणी त्यापेक्षा कमी असतात. अशाच एका मंदिरात अचानक शंभर कोटी रुपयांचा चेक देणगीत आला आणि नंतर घडले ते विचित्रच होते.
विशाखापट्टणम येथील श्रीवराह लक्ष्मी नरसिंहा स्वामी वारी देवस्थानात देणगी मोजण्याचे काम सुरू होते. हे नियमीत काम आहे. त्यामुळे किती मोठी देणगी येणार याची मर्यादा साऱ्यांनाच माहिती आहे. लोक आपापली कामे करत आहेत, पुजा अर्चना सुरू आहे आणि दुसरीकडे देणगी मोजण्याचे काम सुरू आहे. काही लोक देणगीत पैसे टाकतात, तर कुणी दागीणे टाकतात. त्यामुळे ते वेगळे करण्याचे काम सुरू आहे. अशात काही धनादेश हाती लागतात. ते वेगळे ठेवले जातात आणि नंतर त्यांच्यावरील रकमेची नोंद घ्यायला सुरुवात होते. त्यावेळी एका चेकवर चक्क शंभर कोटी रुपयांची देणगी असते.
मंदिर व्यवस्थापनाचा आनंद गगनात मावेनासा होतो. सारे एकमेकांचे अभिनंदन करायला लागतात. व्यवस्थापनाचे लोक हा धनादेश वठवल्यानंतर त्यातून कुठली कामे करायची याचे नियोजन करू लागतात. विश्वस्त लोक बँकेत चेक टाकायला जातात, तेव्हा बँकेतील कर्मचारीही चकित होतात. ते पहिले चेक देणाऱ्याचे खाते तपासतात. तर त्यामध्ये फक्त १७ रुपये असल्याचे लक्षात येते. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाचा चांगलाच संताप झाला. मस्करी करण्यासाठी हा प्रकार केल्याचे सर्वांच्याच लक्षात येते.
चेकचा व्हिडियो व्हायरल
या चेकचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियाव जोरदार व्हायरल होत आहे. चेकवर लिहिलेली रक्कम आणि इतर माहिती देखील स्पष्ट दिसत आहे. ही माहिती समजल्यावर गावकऱ्यांसह अन्य भाविकांनी देखील यावर निराशा आणि संताप व्यक्त केलाय.
Visakhapatnam Temple Devotee Drop Cheque 100 Crore
Cheating on God! The staff of the famous Sri Varaha Lakshmi Narasimha temple, Simhachalam in Visakhapatnam found a cheque for 100 crores in Temple ‘Hundi’ (offering box) but left in stunning disbelief after the bank informed them that the donor’s account had only Rs 17 available. Andhra Pradesh