नाशिक– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने का. का. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन आणि रिसर्च नाशिक (स्वायत्त)च्या ११ विविध अभ्यास मंडळांवर कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून मान्यवरांच्या नियुक्त्या केल्या असून त्यात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयासाठी विशाल जातेगांवकर यांचा समावेश आहे.
तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असल्याचे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.मुंजाजी रासवे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. विशाल जातेगांवकर हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सावाना सदस्य जयप्रकाश जातेगावकर आणि नामकोच्या ज्येष्ठ संचालिका सौ.राजनीताई जातेगांवकर यांचे चिरंजीव आहेत. विशाल हे बीकॉम, एमबीए असून टाइम इन्स्टिटय़ूटचे ते संचालक आहेत. नाशिक आणि नाशिकरोड येथे त्यांच्या शाखा आहेत. पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना करियरबाबत योग्य समुपदेशन करण्याचे कार्य ते अविरतपणे करीत असून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊन त्यांना मनासारख्या नोकऱ्या मिळाल्यात तर काहींनी आपले स्वतंत्र उद्योगधंदेही थाटले आहेत. अभ्यासमंडळावरील नियुक्तीबद्दल विशाल जातेगांवकर यांचे विभाग प्रमूख प्रा. डॉ. चांदवडकर यांच्यासह सर्व थरांतून अभिनंदन होत आहे.