आपली रास कन्या आहे का?
२०२३ हे वर्ष असं जाईल
वाचकांच्या आग्रहास्तव सर्व बारा राशींच्या व्यक्तींना नवे वर्ष कसे जाणार याबाबतचा रोज एका राशीचा अंदाज दहा टिप्सच्या स्वरूपात आपण देत आहोत.
कन्या राशीवर बुधाचा अंमल आहे. पृथ्वी तत्त्वाची ही रास आहे. तर, विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषींची मान्यता आहे. मीन रासही कन्या राशीची विरोधी रास मानली जाते.
कन्या जन्मरास असणाऱ्यांमध्ये उत्कृष्ट बुद्धिमत्ता व संशोधक वृत्ती दिसून येते. त्या व्यक्तींना ऐनवेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद यांच्या जोरावर या राशीच्या लोकांना लोकप्रियता मिळते. ही माणसे निरीक्षण हातोटी उत्तम असलेली, अंतर्मनाचा थांग लागू न देणारी, पैशाच्या बाबतीत काटेकोर आणि, दूरचा विचार करणारी असतात. यांना माणसाची उत्तम पारख असते. ज्या व्यक्तींच्या नावाचे अद्याक्षर टो,पा,पी,मु,मू,ष,ग,ड,पे,पी,ज हे असते त्यांची रास कन्या असते.
कन्या रास २०२३
१) कन्या राशीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, एमबीए, फायनान्स, एचआर, कंपनी सेक्रेटरी, घरची परिस्थिती चांगली असल्यास राजकारण, आर्किटेक्ट, इम्पोर्ट एक्सपोर्ट या क्षेत्रात प्रयत्न करावे….
२) कन्या राशीच्या व्यक्तींनी शक्यतो स्वतःच्या जागेत करावा. परंतु भागीदारी व्यवसाय करू नये…
३) विवाह इच्छुकांनी यंदाच्या वर्षी जास्तीच्या अपेक्षांना मुरड घालावी. आपल्या योग्यतेप्रमाणे अपेक्षा ठेवाव्या….
४) कोणत्याही प्रकारच्या दीर्घ गुंतवणुकीसाठी हे वर्ष अतिशय चांगले आहे…
५) ऍसिडिटी, खोकला, कफ, अंगदुखी, पाठदुखी, डावा खांदा दुखणे याकडे दुर्लक्ष नको..
६) कुटुंबांतर्गत व्यवहारात गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे प्रथमपासूनच सर्व गोष्टी स्पष्ट असाव्यात..
७) महत्त्वाची रेंगाळलेली कामे नवीन वर्षात पूर्ण होणार आहेत. परंतु त्या संदर्भातील जुनी कागदपत्रे शोधण्याला मात्र वेळ जाईल…
८) महिला वर्गाची नोकरीच्या ठिकाणी बढती. व्यवसायात नवीन क्षेत्रामध्ये संधी. त्याचप्रमाणे महिलांना वाहन चालवण्याची इच्छा पूर्ण होईल….
९) सामाजिक तसेच राजकारण क्षेत्रातील व्यक्तींना या वर्षात विशेष यश लाभेल. मात्र विश्वासू व मोजके सहकारी त्याचप्रमाणे टाईम टेबल आवश्यक….
१०) जुन्या अथवा नवीन कोणतेही वाहन खरेदी करा. परंतु शक्यतो गडद रंगाचे वाहन टाळा…
टीप – वरील टिप्स या कन्या राशीसाठी सर्वसमावेशक आहेत. कन्या राशीत असलेली चित्रा, उत्तरा, हस्त या नक्षत्राप्रमाणे भिन्न तसेच कुंडली पाहून व्यक्तिगत सविस्तर सल्ला दिला जाईल….
महाराष्ट्रभर वास्तु व्हिजिट कॉम्प्युटर कुंडली शुभनवरत्न व्यक्तिगत सविस्तर ज्येष्ठ मार्गदर्शन भवानी ज्योतिष.. पं. दिनेशपंत ..फक्त व्हाट्सअप संपर्क 9373 91 34 84….
सर्व राशीच्या वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Virgo Kanya Ras horoscope Astrology 2023 Year