इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना होत आहे. मात्र, हा सामना अव्वल फलंदाज विराट कोहलीसाठी खास आहे. कारण, हा त्याचा १००वा कसोटी सामना आहे. याची दखल घेत टीम इंडियाने विराट कोहलीसाठी हा सामना खास बनवला. भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. त्यावेळी टीम इंडियातील सर्व खेळाडू विराट पॅव्हेलियन मधून येत असलेल्या मार्गावर दोन्ही बाजूने उभे राहिले. कोहली मैदानावर येताच त्यांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यामुळे ही बाब कोहलीसाठी खास ठरली. त्यानंतर कोहलीने कर्णधार रोहित शर्माची गळाभेट घेतली. त्यानंतर सर्व टीम मेंबर्सनी एकत्र येत जोश निर्माण केला. तसेच, कोहली कोहली अशा घोषणाही दिल्या. दरम्यान, भारताने आपला पहिला डाव ५७४ (८ गडी बाद) धावांवर घोषित केला. रविंद्र जडेजाने सर्वाधिक १७५ धावा केल्या.
बघा गार्ड ऑफ ऑनरचा हा व्हिडिओ
https://twitter.com/BCCI/status/1500031323062562818?s=20&t=Rpsm7tN0BQo7VibbLcNB6g