मुंबई – कोरोनामुळे मुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगामध्ये चिंता व्यक्त होत आहे. सहाजिकच कोरोनाचे नियम सर्व क्षेत्रांसाठी लागू असून त्यांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. परंतु क्रिकेट क्षेत्रात मात्र कोरोना नियमांचे पालन केले जात नाही, असे दिसून येते.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरता क्रिकेट सामने रद्द केले जात असतानाच वरिष्ठ नामांकित खेळाडू आणि प्रशिक्षक असलेले पदाधिकारी मात्र याच कालावधीत अन्य कार्यक्रम आयोजित करतात, तेव्हा बीसीसीआय त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न क्रिकेट क्षेत्रात उपस्थित केला जात आहे.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटची कसोटी रद्द करण्यात आली. सामना रद्द झाल्यानंतर, कसोटी मालिकेचा निकाल काय लागला, यावर सध्या काहीही ठरवले जात नाही. ही सलग दुसरी मालिका आहे, भारतीय संघात कोरोनाच्या संसर्गामुळे मालिका रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे.
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी मैदान न घेतल्यामुळे सामना रद्द करण्यात आल्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहलीही यावेळी उपस्थित होता. या कार्यक्रमात, कोरोना नियमाचा भंग झाला असून अशा स्थितीत बोर्ड प्रशिक्षक आणि कर्णधार या जोडीवर काही कारवाई करतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात विराट आणि त्याचे सहकारी उपस्थित होते, तसेच बाहेरचे पाहुणेही आलेले होते आणि ब्रिटनमधील नियमांच्या शिथिलतेमुळे कोणीही मास्क घातला नव्हता. दरम्यान रवि शास्त्री किंवा विराट कोहली यांनी बीसीसीआय कडून या हॉटेलमध्ये सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लेखी परवानगी घेतली नाही. तसेच अध्यक्ष सौरव गांगुली किंवा सचिव जय शहा यांच्याकडून परवानगी घेण्यात आली नव्हती.
ब्रिटनमध्ये कोरोना नियमांमध्ये शिथिलता आहे, परंतु अशा रितीने गर्दी टाळली पाहिजेत. अनेक लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यानंतर मुख्य प्रशिक्षक शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ तज्ज्ञ नितीन पटेल पॉझेटिव्ह आढळले. या सर्वांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आता या सर्वांना लंडनमध्ये विलगीकरणामध्ये ठेवले आहे.