इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सिनेमा असो की क्रिकेट यामधील सेलिब्रिटींच्या श्रीमंती विषयी सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. कोणाकडे किती प्रॉपर्टी आहे, यासंदर्भात नेहमीच चर्चा होते. क्रिकेटमधील अनेक खेळाडू अति श्रीमंत आहेत. त्यापैकी काहींची श्रीमंती पाहून तर आपले डोळे दिपतील इतके पैसे त्यांच्याकडे पैसे आहेत.
विराट कोहली व अनुष्का शर्मा संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले: विराट कोहली व अनुष्का शर्मा हे भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहेत. दोघांची एकूण संपत्ती १,२५० कोटींहून अधिक आहे. विरुष्काचे नाव खूप प्रसिद्ध आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी एकमेकांना डेट करताना कधीही त्यांचे नाते सार्वजनिक केले नाही, जरी दोघेही अनेक प्रसंगी एकत्र दिसले. विराट कोहली आणि अनुष्का शर्माची खास गोष्ट म्हणजे हे दोघेही संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांच्या क्षेत्रातले नव्हते.
भारतातील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक
फोर्ब्स इंडिया 2019 च्या यादीनुसार, हे जोडपे भारतातील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहे. विराट कोहलीची एकूण संपत्ती तेव्हा अडीचशे कोटी होती, तर अनुष्का 21 व्या क्रमांकावर होती. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर होता. तर आता विराट कोहलीची संपत्ती 900 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.
विराट कोहली व अनुष्का शर्मा यांची एकूण संपत्ती १२०० कोटी
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लव्ह मॅरेज झाले आहे. आता दोघे एका घरात राहतात, मात्र त्यांचे घर 34 कोटी रुपये आहे. तसेच विराट कोहलीचे दिल्लीतील पश्चिम विहारमध्ये आलिशान घर आहे. विराट कोहली आणि अनुष्काकडे अनेक आलिशान कार आहेत. त्याचवेळी अनुष्का शर्मानेही चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून भरपूर कमाई केली आहे.त्यामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची एकूण संपत्ती १२ अब्ज रुपये आहे.