इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याचा काळ आधुनिक असला तरी माणसांनी एकमेकांना दिलेल्या वेळेला आयुष्यात काहीच पर्याय नसतो. सध्याचे आयुष्य हे घड्याळ्याच्या काट्यावर सुरू आहे. या व्यस्त आयुष्यातून घरच्यांसाठी थोडा वेळ काढणं सोप्प नाही. त्यात सेलिब्रिटी म्हटल्यावर तर हे अगदीच कठीण आहे. तरीही त्यातून जोडीदारासाठी वेळ काढणे हे एका गोड नात्याचे लक्षण आहे. अशाच सेलिब्रेटींपैकी एक हॉट कपल आपल्या कामातून वेळ काढून सोबत एकत्र वेळ घालवत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली हे चर्चेतील हॉट कपल आहे. त्यांचे चाहते त्यांना परफेक्ट कपलही म्हणतात. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि एकमेकांसोबत फोटो शेअर करताना दिसतात.
अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये आहे, जिथे तिचा आगामी चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’चे शूटिंग सुरू आहे. विराट कोहली नुकताच आशिया कप २०२२ साठी दुबईत होता. त्यानंतर तो अनुष्काला यूकेमध्ये भेटला. अनुष्काने विराटसोबतचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवरून अनुष्का आणि विराट क्वालिटी टाइम घालवत असल्याचे दिसते.
अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. फोटोंमध्ये ती आणि विराट कॉफी एन्जॉय करताना दिसत आहेत. अनुष्काने तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या दोन फोटोंमध्ये अनुष्का आणि विराटचा चेहरा दिसत नाहीये. त्याचवेळी, तिसरा फोटो प्रत्यक्षात सेल्फीचा आहे, ज्यामध्ये दोघेही मोकळेपणाने हसताना दिसत आहेत. दोघेही जागेत कॉफी टेबलवर बसले आहेत. पोस्टसोबतच अनुष्काने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे.
अनुष्का शर्माच्या या पोस्टवर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. शिबानी दांडेकर आणि झोया अख्तर यांनीही हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. युझर्स दोघांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. सध्या ती ‘चकडा एक्स्प्रेस’चे शूटिंग करत आहे. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘झिरो’ चित्रपटात अनुष्का दिसली होती. त्यानंतर बाळंतपणासाठी म्हणून तिने ब्रेक घेतला होता.
Cricketer Virat Kohli Actress Anushka Sharma Quality Time Spending
Entertainment