विशेष प्रतिनिधी, मुंबई
जगात सर्वाधिक श्रीमंत कोण? तसेच भारतात कोणाची संपत्ती जास्त याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. फोर्ब्स कंपनीच्या वतीने दरवर्षी जगातील श्रीमंतांची तसेच श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येते. यंदा देखील अशी जाहीर करण्यात आली असून या यादीत प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याचा समावेश आहे.
फोर्ब्सच्या यादीत सलग पाचव्या वर्षी सर्वाधिक मानधनाच्या १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळविलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे. गेल्या वर्षी सुमारे १९७ कोटी रुपये (२६ दशलक्ष डॉलर्स) सह ६६ व्या क्रमांकावर असलेल्या कोहलीने आता सात स्थानांने वर झेप घेतली आहे आणि आता तो ५९ व्या क्रमांकावर आहेत. त्याच्या कमाईत सुमारे ३२ कोटींची वाढ झाली आहे.
बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार असलेल्या कोहलीने १२ महिन्यांत सुमारे २२९ कोटी रुपये ( ३१.५ दशलक्ष डॉलर्स) कमावले आहेत. त्यापैकी सुमारे २५ कोटी रुपये (३.५ दशलक्ष डॉलर्स) वेतनातून आले आहेत आणि सुमारे २०४ कोटी रुपये (२८ दशलक्ष डॉलर्स) जाहिरातींमधून आले आहेत.
प्लेस्ट्रेम मिक्स्ड मार्शल आर्ट्सचे दिग्गज कर्नर मॅकग्रेगोर जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारा खेळाडू असून त्याने सुमारे १५१७ कोटी रुपये (२०८ दशलक्ष) कमाई केली आहे. तर दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सी दुसर्या क्रमांकावर असून क्रिस्टियानो रोनाल्डो तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या १०० खेळाडूंमध्ये नाओमी ओसाका आणि सेरेना विल्यम्स या केवळ दोन टेनिस महिला खेळाडू आहेत.