मुंबई भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अखेर टी-ट्वेंटी क्रिकेट फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराटने स्वतः एक पत्र ट्विट करून ही माहिती दिली आहे. ऑक्टोबरमध्ये होणा-या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कर्णधारपद सोडणार आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये सहकार्य केलेल्या सहकार्यांचे त्याने आभार मानले आहेत. क्रिकेटमधील कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये गेल्या आठ-नऊ वर्षांपासून तो कर्णधारपद सांभाळत होता. त्याच्याकडून वाढलेल्या अपेक्षांमुळे फलंदाजीवर विपरित परिणाम होत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. गेल्या ४६ डावांमध्ये त्याला शतकही झळकावता आले नाही. याबाबत विराट कोहलीने उपकर्णधार रोहित शर्मा याच्याशीही चर्चा केली होती. टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये विराटनंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट टी-ट्वेंटी फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार अशा बातम्या येत होत्या.
https://twitter.com/imVkohli/status/1438478585518456832?s=20