इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॅाटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॅाटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॅाटेलवर धाव घेतली. यानंतर हॅाटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विनोद तावडे गेल्या अडीच तासांपासून हॅाटेलमध्ये अडकून पडल होते. आता या घटनेनंतर पोलिस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या एक दिवस आधी ५ कोटी रुपयांची कॅश रंगेहात पकडण्यात आल्याचे सांगीतले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे अत्यंत गंभीर आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? त्यांच्या पकडल्या गेलेल्या डायरीत अशा कोणाकोणाला पैसेवाटप झाले आहेत? अडीच तास उलटूनही कोणतीच कारवाई का झालेली नाही?
राज्यात सत्ता आणि पैशाचा माज चालु आहे. जनता हे उघड्या डोळ्यांनी बघतेय. उद्या मतदानाच्या दिवशी भाजपला अद्दल घडवल्याशिवाय लोक स्वस्थ बसणार नाहीत..! असेही त्यांनी या सोशल मीडियात म्हटले आहे.