इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात नेहमी कोणत्या ना कोणत्या निवडणुका होतच असतात. अगदी ग्रामपंचायती पासून ते लोकसभा राज्यसभा पर्यंत दरवर्षी वेगवेगळ्या निवडणुका घेण्यात येतात. सहाजिकच त्या त्या क्षेत्रातील मतदार मतदान करतात. या मतदारांना गुप्तपणे पैसे तथा अन्य वस्तू वाटण्यात आल्याची देखील चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातील अनेक भागात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. यावेळी थेट सरपंच पदासाठी देखील निवडणूक झाली. त्यात एक मोठी घटना घडली आहे.
अन्य निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही मतदारांना प्रलोभने दाखवत पैसे वाटण्यात आले. परंतु सरपंच पदासाठी उभे राहिलेल्या उमेदवार निवडून आला नाही. मात्र त्याने निवडणुकीनंतर पराभवाचा वचपा काढत मतदारांकडून चक्क वाटलेले पैसे वसूल केल्याने एकच खळबळ उडाली आहे, आणि याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे.
अनेक निवडणुकीच्या आधी मतदारांना पैशाची लालूच दाखवली जाते, तसेच विविध प्रलोभने देऊन त्यांच्याकडे मत मागितल्याचे अनेक व्हिडीओ हे याआधी समोर आले आहेत. पण मध्य प्रदेशमधून हा वेगळाच प्रकार समोर आला आहे. निवडणूक हरल्यानंतर मतदारांकडून पैसे वसूल केल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. नीमच जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरपंच पदाच्या उमेदवाराविरोधीत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नीमच जिल्ह्यातील मनासा विभागा अंतर्गत ग्राम पंचायत देवरानमधील सरपंच पदाचे उमेदवार राजू दायमा यांचा हा व्हिडीओ असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही गुंड गावकऱ्यांच्या घराचे दार ठोकावून त्यांच्याकडून पैसे वसूल करताना दिसत आहे.
इतकेच नव्हे तर काही जणांना मारहाण करण्यात आली तर काहींना धमकी देऊन पैसे वसूल करण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. कारण असे की, या निवडणुकीच्या आधी लढवणाऱ्या दायमा यांनी मतदारांना पैसे वाटून प्रलोभन दिले होते. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत दुसराच उमेदवार जिंकला. वीरेंद्र पाटीदार यांचा विजय झाला तर राजू दायमा यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर राजू आणि त्यांचे समर्थक संतापले.
राजू दायमा आपल्या काही साथीदारांना घेऊन नागरिकांच्या घरी पोहोचले. तिथे त्यांच्यकडे जबरदस्तीने पैसे मागू लागले. काही जणांना त्यांनी धमकी देत शिवीगाळ केली. याचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. त्यांनी अवघ्या तासाभरात त्यांनी तब्बल चार लाख रुपये वसूल केले. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी याची दखल घेत आरोपी राजू दायमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बघा या संदर्भातील हा व्हायरल व्हिडिओ
चुनाव का एक अन्दाज़ ये भी एमपी के नीमच जिले में जब सरपंच उम्मीदवार पैसे बाँटने के बाद हार गया तो गाँव में पैसा वसूली के लिये निकला. जब वोट नहीं दिया तो पैसा वापस करो. #Election #MadhayPradesh pic.twitter.com/BRVRwP23cz
— Brajesh Rajput (@brajeshabpnews) July 12, 2022
Viral Video Sarpanch Election Money Recover Voters