विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक विजेता पहिलवान सुशील कुमारच्या अडचणी वाढत आहेत. कनिष्ठ राष्ट्रीय विजेता पहिलवान सागर राणा याच्या हत्येचा एक व्हिडिओ समोर आला असून, तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सुशील कुमार आणि त्याचे काही साथीदार दुसऱ्या पहिलवानाला लाठ्याकाठ्यांनी निर्दयतेने मारहाण करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
माध्यमांच्या वृत्तांनुसार, हा व्हिडिओ राणा हत्याकांडाचा असल्याचे बोलले जात आहे. सुशील कुमारला सागर धनखडच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. हत्या, गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत.
पहिलवान सागरच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. डोक्यात जड वस्तूने प्रहार केल्यामुळे सागरचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. लाकडी काठी, लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोके फुटल्याने खूप रक्त वाहिले. रुग्णालयात दाखल करेपर्यंत प्रकृती गंभीर झाली होती. सागरच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या आहेत. फावड्याच्या दांड्याने सागरला मारहाण झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.
सुशील कुमारने दोन ऑलिम्पिक पदक जिंकले आहेत. २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आणि २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये रजत पदकाचा समावेश आहे.२०११ मध्ये त्याला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
बघा हा व्हायरल व्हिडिओ
An exclusive Video of Olympian wrestler #sushilkumar Attacking Junior Wrestler who died later pic.twitter.com/HBPscC4JJE
— Siraj Noorani (@sirajnoorani) May 27, 2021