इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्तीने त्याच्या मुलाच्या तोंडात सिगारेट दिली. आणि त्यानंतर त्या व्यक्तीनेच बंदुकीने गोळी झाडली. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ दक्षिण इराकच्या एका प्रांतातील आहे. व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते पाहून कोणालाही आतून धक्का बसेल. यात एक माणूस आपले नेमबाजीचे कौशल्य दाखवण्यासाठी आपल्या मुलाचा जीव पणाला लावतो आहे आणि तोही सिगारेटच्या प्रकरणात. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती स्वतःच्या मुलाच्या तोंडात सिगारेट ठेवते. त्यानंतर मुलगा समोर आकाशाकडे पाहत आहे आणि वडील दुसऱ्या बाजूला बसलेले आहेत. वडिल आपल्या बंदुकीतून मुलाने तोंडात धरलेल्या सिगारेटला लक्ष्य केले आहे.
वडिलांनी मुलाला सिगारेट तोंडात ठेवण्यास सांगितल्यानंतर त्याने सिगारेटच्या वरच्या भागाला लक्ष्य करून गोळीबार केला. सुदैवाने मुलाला गोळी लागली नाही. सिगारेटचा वरचा भाग मात्र तुटतो. या घटनेदरम्यान त्याने मोबाईलचा कॅमेराही लावला होता. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. हा व्हिडीओ व्हायरल होताच अने जण या व्यक्तीवर संतापलेले असून शिक्षेची मागणी करत आहेत.
https://twitter.com/gulftoday/status/1521539131620352001?s=20&t=BTUrjJGRleP4vgR_BZd_CA