बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सेवानिवृत्त बापानं शिकवला पोरांना धडा… फुटकी कवडीही न देण्याचा निर्णय… बघा, व्हायरल व्हिडिओ

by Gautam Sancheti
जुलै 12, 2023 | 2:37 pm
in राष्ट्रीय
0
Capture 11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या भारतीय जीवनपद्धतीत एकत्र कुटुंब पद्धतीला फार महत्त्व आहे. काळानुसार जरी ती बदलत गेली असली तरी त्याचे महत्त्व कमी होताना दिसत नाही. आताच्या जीवन पद्धतीत आई – वडील, मुले आणि आजी आजोबा एवढेच एकत्र कुटुंबात अपेक्षित आहेत. या एकत्र कुटुंबाचे फायदे अनेक आहेत. यातीलच महत्त्वाचा फायदा म्हणजे जबाबदाऱ्या वाटल्या जाणे. अगदी आजही काही अपवाद वगळता मुलाचे लग्न झाले तरी वडील मुलाला मदत करत असतात, किंवा मुलगा देखील वडिलांची मदत गृहीत धरत असतो. पण, या सगळ्याच परंपरेला छेद देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. आणि काळानुसार तो योग्यही आहे. या व्हिडिओतील वडील म्हणतात की, मी मुलांसाठी का कमवावं. निवृत्तीनंतरचं माझं आयुष्य हे मी माझ्या पद्धतीने जगणार. मुलांना हवं तर त्यांनी स्वतःसाठी कमवावं. हे असं म्हणणारे वडील नेटकऱ्यांना भावतायत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला असून याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओमध्ये काय
हरियाणात राहणाऱ्या धरमवीर यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. स्विमिंग पूलमध्ये शूट केलेल्या या व्हिडिओत ते म्हणतात, ‘निवृत्तीनंतर मी निवांत आयुष्य जगण्याचे स्वप्न पहिले. मात्र, माझ्या मुलांना वाटले की, मी त्यांच्यासाठी पैसे कमवून ठेवेन. पण मी त्यांना एक पैसाही देणार नाही. त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं, एवढंच माझं कर्तव्य आहे. त्यांना आयुष्यभर पोसण्याचा ठेका मी घेतलेला नाही. मी माझ्या पैशाचा आनंद घेईन. मुलांनी त्यांची सोया स्वतः करावी.’ कॅप्शनमध्येही त्यांनी स्वत:साठी कमवा आपली मुले त्यांच्यासाठी स्वत: कमवतील असं लिहलं आहे. प्रथमदर्शनी हा व्हिडीओ पाहून असे काय हे वडील असा प्रश्न पडू शकतो. कारण, अशा मानसिकतेची आपल्याला सवय नाही. कारण, मुलं ही कायमस्वरूपी आपली जबाबदारी आहे असं आपण मानतो. थोडा वेगळ्या धाटणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून धरमवीर हरयाणा यांनी स्वत:च्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आई – वडिलांना समजून घ्या
सगळेच आई-बाबा आपल्या मुलांचे लाड करत असतात. त्यातही ते एकुलते एक असेल तर विचारायलाच नको. स्वतःच्या लहानपणाशी तुलना करून मग मुलांना मागतील ते दिलं जातं. पण, यातून मुलं बिघडण्याचा धोकाही असतो. एका बाजूला मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, त्यांना चांगलं आयुष्य देण्यासाठी झटणारे पालक हे मुलं स्वत:च्या पायावर उभी राहावीत, स्वावलंबी व्हावीत यासाठी देखील प्रयत्नशील असतात.

View this post on Instagram

A post shared by Pankaj Rathee (@dharambirharyana)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिल्लीत आणखी एक श्रद्धा हत्याकांड… महिलेच्या मृतदेहाचे आढळले तुकडे…

Next Post

नाशकात उद्योजकाला तब्बल अडीच कोटींना गंडा… कंपनीच्याच कामगारांनी केला हा सर्व प्रकार… असे झाले उघड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime 6

नाशकात उद्योजकाला तब्बल अडीच कोटींना गंडा... कंपनीच्याच कामगारांनी केला हा सर्व प्रकार... असे झाले उघड

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011