इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सासू सूनेचे नाते हे जगात वेगवेगळे समजले जाते. सासू म्हणजे सारख्या सूचना! आणि सून म्हणजे सूचना नको! असेही म्हटले जाते. सासू सूनेचे नाते आई आणि मुलगी असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती फारशी दिसून येत नाही. कारण सूनही आधुनिक विचारांची असते, तर सासूही परंपरेला धरून चालते. त्यातच किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये वादविवाद होतात.
कधी पती आणि मुलगा यांच्या हक्कावरून ही भांडणे होत असतात. तर कधी नातवावरून देखील वाद होत असतात. अशाच प्रकारे एका सासू सूनेचे भांडण नातवाला मारण्यावरून झाले. आजीने नातवाला थोडे रागवून मारले, त्याचा राग धरून सुनेने चक्क सासूच्या एक नवे दोन नव्हे तर तीन वेळा कानाखाली थापडा मारल्या. आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. आता सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सासू सुनेमधील वाद हा काय नवीन विषय नाही. दोघांमधील वाद आणि भांडणाचे अनेक घटना आपण रोजच्या जीवनात आजूबाजूला पाहत असतो. टीव्ही मालिका असो किंवा चित्रपट यातूनही सासू सूनेच्या नात्यात किती कडवटपणा असतो तेच दाखविण्यात आले आहे. मात्र अपवादात्मक काही सासू सुनेचे नात हे आई मुलीसारखी असतात. सासूकडून सुनेला मारहाण करण्यात आल्याचा घटना किंवा त्या घटनांचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. कारण यात सुनेनेच सासूला मारहाण केली आहे.
एका ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पाहून संताप होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला दिसत आहेत. सून उभी राहून त्यांच्याशी वाद घालत आहे. या वादामध्ये सासू सुनेच्या कानाखाली मारते. त्यानंतर सूनेने सासूला एक नाही दोन नाही सलग तीन वेळा कानाखाली मारली. इतकेच नव्हे तर हाणामारी केली. धक्कादायक म्हणजे मुलगा बाजूला उभा राहून हा व्हिडीओ बनवत होता. पण आपल्या पत्नीला हे कृत्य करण्यापासून त्याने रोखले नाही. या व्हिडीओमधील सासू सूनेच्या वादामागील कारण म्हणजे आजी आपल्या नातवाला थोडी रागवली आणि तिने एक चापट मारली. हेच कारण या सासूसुनेच्या भांडणाचे ठरले. आता या व्हिडीओ आतापर्यंत एक लाख ७९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/gharkekalesh/status/1662009098949509120?s=20
Viral Video Daughter in Law Mother in Law Fight