इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एक ना अनेक गोष्टींनी कायम चर्चेत असलेली एक अभिनेत्री पुन्हा एका नव्या गोष्टींनी चर्चेत आली आहे. मेकअप करणाऱ्या मेकअप दादाच्या थेट कानशिलात लगवल्याचा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामुळे तिच्या चाहत्यांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो विनोदी असल्याचे लक्षात येते आहे.
अभिनेत्री हिना खान कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणारी हिना खान सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. ती कधी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी व्हिडीओंमुळे तिच्या चाहत्यांचे मन जिंकते. हिना खानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. पण अचानक ती तिच्या मेकअपमॅनला थापड मारते. हिनाने हा विनोदी व्हिडीओ तयार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ती मेकअपमॅनला थप्पड मारताना दिसते. मेकअपमॅन तिच्या हातातून लिपस्टिक घेतो, यावर ती जुही चावला हिच्या ‘आईंदा मुझसे ऐसा मजाक किया तो मुंह तोड दुंगी’ या डायलॉगवर अभिनय करताना दिसते. हिनाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video Actress Slap Make up Artist
Instagram Hina Khan Bollywood