मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संस्कृतीत लग्नाला म्हणजेच विवाहसमारंभाला खूपच महत्वाचे स्थान आहे. त्यातच वेगवेगळ्या जाती, पंथ आणि धर्मामध्ये विवाह संदर्भात वेगवेगळे विधी असतात. त्या विधी नुसारच लग्नसमारंभ पार पडतो. परंतु कालानुरूप आता त्यात काही बदल होत आहेत. परंतु अद्यापही काही समाजांमध्ये रुढी परंपरेने नुसारच लग्न समारंभ होतात. मात्र या रुढी परंपरेला फाटा देत पंजाब मध्ये एका नववधूने चक्क आपल्या स्वतःच्या लग्नात अत्यंत सुंदर डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
प्रत्येकाला आपल्या लग्नात काहीतरी आगळेवेगळे करायचे असते. यामध्ये मुलीही मागे राहिल्या नाहीत. या डिजिटल युगात रोज एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक वधू तथा नवरी ही जुनी परंपरा मोडून आपल्या भावी वरला तथा नवऱ्याला अंगठी घालत असून आपल्या कुटुंबासोबत नाचत आहे.
लग्नातील वधूच्या विशेष डॉन्सचा एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये, गुरुग्राममधील रहिवासी सबा कपूरने तिच्या सरप्राईड ब्राइडल एन्ट्रीमध्ये तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींचा समावेश केला होता. हा व्हिडिओ YSDC वेडिंग कोरिओग्राफीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये सबा कपूर आणि तिचे कुटुंब सन 2016 च्या ‘बार बार देखो ‘ या चित्रपटातील ‘सौ आसमान ‘ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, त्याचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य कॉरिडॉरमध्ये उभे आहेत आणि काही जण प्रचंड नाचत आहेत. यात एकीकडे वर उभा आहे तर दुसरीकडे वधू नाचत आहे. वधू तेथील मार्गावरून मिरवणूकीने चालत असताना, प्रत्येकजण तिच्याबरोबर नाचतो.
https://twitter.com/Rajayshworld/status/1479507341527719936?s=20
वास्तविक हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर गेल्या महिन्यात शेअर करण्यात आला होता, तेथे त्याला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि लाखो छान कंमेंटस् (प्रशंसा ) मिळाल्या आहेत, तरीही हा व्हिडिओ नुकताच ट्विटरवर पोस्ट करण्यात आला. त्यामुळे हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण जोरदार कमेंट करत आहेत. चित्रपट निर्माते मनीष मुंद्रा यांनी ट्विटरवर लिहिले की, मी हा प्रसंग माझ्या मनातून काढू शकत नाही. तो खूप ऊर्जा आणि प्रेमाने भरलेले आहे.