इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाटने ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस लोपेजचा पराभव करत अंतिम फेरी गाठल्यानंतर तीला महिलांच्या ५० किलो वजनाच्या अंतिम फेरीच्या कुस्तीसाठी अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर या निर्णया विरुध्द क्रीडा लवादाकडे दाद मागण्यात आली होती. सात दिवसांपासून त्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण, बुधवारी या याचिकाचा निकाल आला. फोगाट यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे भारताची ऑलिम्पिक स्पर्धेतील पदाची संख्या आता सहाच राहणार आहे.
या निर्णयानंतर भारतीय ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विनेश ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती. पण, वजनांचा मुद्दा तीला अपात्र ठरवण्यासाठी कारणीभूत ठरला.
अशी गाठली होती अंतिम फेरी
विनेशने क्युबाच्या लोपेजला ५-० अशी मात दिली. या सामन्यातील पहिली फेरी खुपच अतितटीची झाली. त्यामुळे कोण आघाडी घेणार अशी स्थिती होती. अखेर विनेशने १-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत विनेशने २-२ गुणांची आघाडी घेत ५-० अशी स्थिती आणली. या स्थितीत क्युबाच्या कुस्तीपटूला कमबॅक करता आले नाही. विनेशने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. पण, ती अपात्र ठरली. त्यानंतर आता निकालही तीच्या विरोधात गेला.