शुक्रवार, ऑक्टोबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार…भुजबळ

जानेवारी 25, 2025 | 4:47 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250124 WA0435 1

लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असून कांद्याच्या दराबाबत अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची नितांत आवश्यकता आहे. या प्रक्रिया उद्योगासाठी बाजार समितीने देखील लक्ष घालून या प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन यांच्या हस्ते आज लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उप बाजारात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, संचालक पंढरीनाथ थोरे, डी.के.जगताप, जयदत्त होळकर, डॉ. श्रीकांत आवारे, राजेंद्र डोखळे, तानाजी आंधळे, भीमराज काळे, छबुराव जाधव, रमेश पालवे, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, सरपंच सचिन दरेकर, दत्तूपंत डुकरे, बाळासाहेब पुंड, शिवाजी सुपणर, रामभाऊ जगताप, गोरख शिंदे, विलास गोरे, राजाराम मेमाणे, बबन शिंदे, नीरज भट्टड बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दिवसेंदिवस विंचुर उपबाजार आवारावर शेतमाल आवकेत वाढ होत असल्याने बाजार समितीस सध्या असलेली जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बाजार समितीने मौजे सुभाषनगर शिवारातील ८ हेक्टर २१.२९ एकर जागा शासकीय दराने संपादीत करणेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. सदरचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे.लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क २० टक्के लादलेले आहे. त्याचा परिणाम निर्यातीवर होत असून निर्यात शुल्क शून्य केल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. कांद्याचे दर अनेकदा वर खाली होत असतात. कांदा पूरक व्यवसायाकडे आता शेतकऱ्यांनी देखील वळणे गरजेचे आहे. कांदा पावडर सारखा चांगला उद्योग शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून केला तर इतर देशांमध्ये मोठी मागणी कांदा पावडरला आहे. याकडे या उद्योगाला चालना देण्यासाठी बाजार समितीने विशेष लक्ष देऊन प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, लासलगाव बाजार समिती ही राज्यातील ३०५ बाजार समित्या मधून प्रथम क्रमांक पटकावलेली बाजार समिती आहे. त्यामुळे शेतकरी मापारी कामगार यांचे हित जपण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून काम करावे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संचालक मंडळाला केले.
यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक पंढरीनाथ थोरे, जयदत्त होळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराज काळे यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार…केंद्रीय मंत्री अमित शाह

Next Post

मालेगावमध्ये अमित शाहांनी भुजबळांना बोलावून खुर्चीवर बसवलं, व्यासपीठावर चर्चाही केली…नेमकं घडलं काय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
IMG 20250124 WA0402 e1737761345590

मालेगावमध्ये अमित शाहांनी भुजबळांना बोलावून खुर्चीवर बसवलं, व्यासपीठावर चर्चाही केली…नेमकं घडलं काय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011