अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते आगळेवेगळे असते पूर्वीच्या काळी गुरु शिष्य परंपरा होती. भारतीय संस्कृतीत या परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. तीच परंपरा आधुनिक काळात विद्यार्थी व शिक्षकांमध्ये दिसून येते. शिक्षक हे विद्यार्थी घडवतात. साहजिकच त्यांच्यामध्ये एक ऋणानुबंध नाते तयार होते. परंतु शासकीय शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांची बदली होते, त्यामुळे त्यांचा संबंध तुटतो. परंतु काही शिक्षक असे असतात की, त्यांची बदली झाल्यावर निरोप देताना शिक्षकांना विद्यार्थ्यांना अक्षरशः रडू कोसळते. शिक्षक देखील भावनिक होतात, अशीच एक घटना अहमदनगर जिल्हयात घडली. एका शिक्षकांच्या बदलीने फक्त विद्यार्थीच नव्हे तर गावकरीही रडले, अन् या ह्रदयस्पर्शी निरोप समारंभाचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ट्वीट केला आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रम
पाथर्डी तालुक्यामधील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लहू विक्रम बोराटे यांची एक तपानंतर म्हणजे तब्बल १२ वर्षांनी बदली हनुमाननगर शाळेमधून बदली होवून ते धनगर वस्ती (ता. जामखेड ) या ठिकाणी रुजू झाले. झाली. ही शाळा उसतोड कामगारांच्या मुलांची शाळा म्हणून ओळखली जात असे. या एक तपाच्या काळात बोराटे यांनी या शाळेचा कायापालट केला. विद्यार्थ्यांना पुस्तकां सोबतच डिजीटल जगताची ओळख होण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. डीजिटल शाळा, हस्ताक्षर स्पर्धा, हरित शाळा, तसेच शाळेला थ्रीडी पेंटिंग अशा अनेक उपक्रम त्यांनी मुलांसाठी सुरू केले. त्यामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर अनेक पुरस्कारही पटकावले. त्यांनी प्रामणिकपणे प्रेरणास्थान होवून दिवसरात्र काम केले. या गावातील प्रत्येक विद्यार्थांना सर जणू घरातील सदस्याप्रमाणे वाटायचे.
भाषण करताना हुंदके
बोराटे सर त्यांच्या बदलीच्या आदेशानंतर संपूर्ण गाव जणू दुःख व्यक्त करत होते. बोराटे सरांना निरोप देण्यासाठी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, आजी- माजी विद्यार्थ्यांसह संपूर्ण गाव लोटले होते. भाषण करताना अनेक मुलांना हुंदके आले. तसेच सरांचे कौतुक करताना सहकाऱ्यांना कोसळलेले रडू अन् गावातील प्रत्येकजण सरांची आठवण सांगून भावूक होताना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या ह्रदयस्पर्शी निरोप समारंभाचा व्हिडिओ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शेअर केला आहे. त्यांनी म्हटले ‘लळा असा लावावा की शिक्षकाच्या निरोपावेळी फक्त शाळेतील विद्यार्थीच नाही, तर गावातील गावकऱ्यांनाही गहिवर दाटून यावा! ‘ पाथर्डी तालुक्यामधील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या निरोप समारंभाचे हे दृश्य हेलावून टाकणारे आहे. असा सुंदर कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1671442241506918400?s=20