नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीज पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांबाबत बहुतांश ग्राहकांचा अनुभव आहे, असे बोलले जाते. मात्र, अनेकदा असे लक्षात येते की, कंपनीचे कर्मचारी जीव धोक्यात घालून त्यांचे कर्तव्य बजावत असतात. आताही तसाच प्रसंग समोर आला आहे. इगतपुरी तालुक्यातील मुसळधार पावसामुळे रायंबे येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीचे वायरमन (प्रकाशदूत) हे मुकणे धरणातील पाण्याच्या प्रवाहात पोहत गेले. त्यानंतर त्यांनी खांबावर चढून ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. या कामगिरीबद्दल रायंबे गावकऱ्यांसह महावितरण कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
बघा हा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/MSEDCL/status/1550122419087585281?s=20&t=17DnIzX7P3-Kr57LTldEFA
Village Electricity Supply He Will Swim in Dam Water Thrilling Video