इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीचा एक एक आमदार निवडून आणण्यासाठी सरकारी तिजोरीतून प्रत्येकी १० कोटींचा खर्च होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, महायुतीचा एक एक आमदार निवडून आणण्यासाठी सरकारी तिजोरीतून प्रत्येकी १० कोटींचा खर्च
निवडणुकीपूर्वी जनतेच्या पैशातून स्वतःचा प्रचार आणि प्रसार करायला जाहिराती कमी पडल्या की आता सोशल मीडिया मार्केटिंग महायुतीने ९० कोटींचे टेंडर काढले आहे.
एकीकडे आचारसंहिता लागणार म्हणून विविध विभागात स्पर्धा लागली आहे, खर्च करायला निधी मिळावा, आणि दुसरीकडे सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी पैसे वाया घालवले जात आहेत.
राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळाले नाही, कंत्राटदार बिलासाठी आंदोलन करत आहे, शिष्यवृत्तीचे पैसे अडकले आहेत पण सरकारी पैश्यावर स्वतःला चमकवण्यासाठी मात्र १५०० कोटींचा डल्ला आता पर्यंत मारला गेला आहे.