मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यांनंतर आता धनगर आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील जाळ्यावर उड्या मारल्या आहेत. महायुती सरकारने महाराष्ट्रातील विविध समाजात किती अस्वस्थता निर्माण केली आहे याचे हे चित्र आहे. महायुतीने महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सर्कस करून ठेवली आहे. एका मागून एक आंदोलन होत आहे. पण सरकार अजूनही निष्क्रिय असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ते म्हणाले की ,दोन समाजात निवडणुकीच्या तोंडावर असे वाद लावणे योग्य नाही, या आंदोलनमध्ये जीवाला धोका देखील आहे.सरकारने तात्काळ ह्यात लक्ष घालून दोन्ही समाजातील असंतोष मिटवावा ही आमची मागणी आहे.