इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील कंत्राटदारांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महायुती सरकारच्या आर्थिक बेशिस्त कारभारामुळे राज्यातील कंत्राटदारांची तब्बल ४० हजार कोटींची बिल थकली असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कंत्राटदार आणि आणि अभियंता संघटनांनी पाच वेळा आठवण करून देऊनही या सरकारने बिल चुकती केली नाही. स्वतःच्या प्रचारासाठी सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू आहे, पण काम करणाऱ्या कंत्राटदारांची बिल द्यायला तिजोरीत पैसे नाही.मला खूप आर्थिक शिस्त आहे, मी खूप आर्थिक शिस्त पाळून काम करतो निर्णय घेतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार सगळीकडे सांगतात.
हे सरकार जाता जाता महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करून महाराष्ट्राला खड्ड्यात घालत आहेत. ती आर्थिक शिस्त आता कुठं गेली? सरकारी तिजोरीतून कोण उधळपट्टी करत आहे हे महाराष्ट्र समोर यायला हवे.