मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या कारभारावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, एका हाताने देऊन, दुसऱ्या हाताने लुटण्याचा कारभार महायुती सरकार करत आहे.
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, आता लहान कामांसाठी लागणाऱ्या शपथपत्रासाठी सुद्धा कमीत कमी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क महाराष्ट्रातील नागरिकांना द्यावे लागणार आहे. एका हाताने देऊन, दुसऱ्या हाताने लुटण्याचा कारभार महायुती सरकार करत आहे.
मतांसाठी लाडकी बहिण योजना आणली. योजनेच्या जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. इतर योजनांना कट लावून ही जाहिरातीसाठी सरकारला पैसे अपुरे पडत आहे. म्हणूनच काय तर मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतला सरकारने घेतला आहे. महागाई,वीज दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ… ह्यात आणखी भर घालत आता १००-२०० रुपयांमध्ये होणाऱ्या कामासाठी नागरिकांना ५०० द्यावे लागणार आहे.