इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विषारी वक्तव्य करून नितेश राणेंना महाराष्ट्रात भाजपचा “योगी” बनायचा आहे. प्रक्षोभक वक्तव्य केल्याने पक्षात नितेश राणेंना मिळत असलेली बढती ही भाजपच्या इतर प्रस्थापित नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे. निलेश राणे हा संधीसाधून माणूस आहे असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते म्हणाले की, राणे हे काँग्रेसमध्ये होते. २०१७ चे व्हिडिओ बघा, हलाल केलेलं मटण दाबून खातांना दिसत आहे. तेहीही खातात वडीलही खात आहे. काल रमजानच्या ईद मिलन समारंभात ते मटण तोडतांना दिसत आहे. याचा अर्थ काय समजायचं. सोयीनुसार विष पसरवण्याचे काम करत असाल तर याला लोकशाही म्हणायाचं नाही. अशा प्रवृत्तीमुळे हा देश तालीबान होईल.
गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे यांच्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत आहेत. त्यांच्या अनेक विधानामुळे वाद तयार होत आहे. त्यावर आता काँग्रेसकडून सडकून टीका करण्यात आली आहे.