इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! बदलापूर प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला संपवून भाजपशी संबंधित संस्था चालकांना वाचवण्याचा प्रयत्न गृहखात्याचा आहे का ? हा प्रश्न आज उपस्थित होत आहे. याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली?
आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात?
बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे.. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही असेही त्यांनी सांगितले.