मुंबई – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी राजीनामा दिल्यामुळे सर्वांना आश्चर्य़ाचा धक्का बसला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल यांना सोपावला आहे. या राजीनाम्यामागे कारण पुढे आले नसले तरी नेतृत्वात बदल करण्याचा निश्चय वरीष्ठ पातळीवर झाल्यानंतर हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. या राजीनाम्यानंतर आता गुजरातचा नवीन मुख्यमंत्री कोण याबाबत उत्सुकता आहे. मनसुख मांडविया, नितीन पटेल, सी. आर. पाटील, गोरधन जडाफिया यांचे नाव चर्चेत आहे.
विजय रुपाणी यांनी २६ डिसेंबर २०१७ रोजी दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांच्या कामाबाबात फारशा तक्रारी नव्हत्या. तरी सुध्दा त्यांना हा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागल्यामुळे सर्वांनाच धक्का बनला. त्यांच्याच नेतृत्वात भाजपने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागांवर विजय प्राप्त करुन सत्ता मिळवली होती. या बदलावर बोलतांना रुपाणी म्हणाले की, पक्षात वेळोवेळी बदल होत असतात. पक्षात ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. मला पाच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे. पार्टीच्या संघटन कामात काम करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.