इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात फरार झालेला भ्रष्टाचारी उद्योजक विजय मल्ल्या याच्या संदर्भात भारतात अद्यापही तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता फरार विजय मल्ल्या यांनी ट्विट करून होळीच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर युजर्सनी त्यांना ट्रोल केले.
मल्ल्या यांनी ट्विटरवर हॅप्पी होली लिहिल्यानंतर युजर्सनी बँक फसवणुकीचे पैसे परत करण्यास सांगितले. मल्ल्या यांच्यावर 9000 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर मल्ल्या भारतातून पळून गेला आणि लंडनला गेला.
दरम्यान, विजय मल्ल्या यांनी गुरुवारी रात्री एक ट्विट केले आणि लिहिले की – “सर्वांना होळीच्या शुभेच्छा”. त्यानंतर लगेचच ट्विटर युजर्सनी मल्ल्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कुणी लिहिलं की, आधी पैसे परत करा, तर कुणी म्हटलं की, सर्वांना पांढरा रंग ( चुना ) लावल्यावरच भारतात परत येणार का? युजर्सनी कमेंट बॉक्समध्ये मल्ल्यावरील मजेदार मीम्सही शेअर केले आहेत.
https://twitter.com/faijalkhantroll/status/1504517835648774144?s=20&t=ji3FiS4dT2WwxWVcZN_jlg
अलीकडेच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्तेतून बँकांनी 18000 कोटी रुपये वसूल केले आहेत. त्याचप्रमाणे आणखी वसुली करण्यात येणार आहे, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली.
तसेच मेहता म्हणाले की, पीएमएलए अंतर्गत न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार अंमलबजावणी संचालनालय ईडीने बँक डिफॉल्ट प्रकरणात ही रक्कम जप्त केली. या फरार व्यावसायिकांकडून घोटाळ्याची संपूर्ण रक्कम लवकरात लवकर वसूल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
https://twitter.com/FeelHapi/status/1504502055959875588?s=20&t=LM5fMnJsnAkO1M3759RMfg