शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2021 | 5:44 pm
in राज्य
0
IMG 20211029 WA0214

मुंबई – राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. “वीज कंपन्यांमध्ये वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी,कर्मचारी यांना १२ हजार तर सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल,” अशी घोषणा डॉ. राऊत यांनी या बैठकीच्या समारोप प्रसंगी केली.

सुरुवातीला वर्ग १ व २ च्या अधिकारी यांना वगळून १० हजार सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला. मात्र कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर व त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली. या बैठकीला सर्व संघटनांचे पदाधिकारी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे,मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे हे उपस्थित होते. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली.

“वीज बिलाची प्रचंड थकबाकी, शासनाकडून पाणीपुरवठा, पथदिवे यांच्याकडून न मिळालेले अर्थसहाय्य तसेच कोळसा कंपनीची थकबाकी, वीज निर्मिती करणाऱ्या शासकीय व खासगी कंपन्यांची प्रलंबित देयके, कृषीपपांची नगण्य वीज वसुली इत्यादी कारणांमुळे सध्या तिन्ही कंपन्या अत्यंत बिकट अशा आर्थिक संकटातून वाटचाल करत आहे, अश्या परिस्थितीत आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून सानुग्रह अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे,” असे डॉ राऊत यांनी यावेळेस सांगितले.
गेल्या दीड वर्षात कोरोना साथीमुळे उद्योग धंदे व व्यवसाय दीर्घकाळ बंद राहिल्याने तिन्ही वीज कंपन्यांच्या महसूलावर खूप अनिष्ट परिणाम झालेला आहे. यात अधिकची भर म्हणून निसर्ग, तौक्ते चक्रीवादळे, अतिवृष्टी व महापुरामुळे वीज यंत्रणेचे अपरिमित नुकसान होऊन आर्थिक स्थिती खालावलेली आहे,याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

“कोरोनाच्या काळात तिन्ही कंपन्यांतील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या जीवाची बाजी लावून महाराष्ट्रातील जनतेला अखंडित वीजपुरवठा दिला तसेच महापुराच्या अभूतपुर्व संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून वीज पुरवठा सुरळीत केला,” अशा शब्दांत त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचा गौरव केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेतरस्ता व वहिवाटीच्या दाव्याबाबत महसूल आयुक्त गमे यांनी दिले हे आदेश

Next Post

दिवाळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी काढले हे आदेश

Next Post
suraj mandhare e1708949872195

दिवाळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी काढले हे आदेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011