इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीने २२२ पेक्षा जास्त जागेवर आघाडी घेतली असून महाविकास आघाडी ५३ जागेच्या पुढे जातांना दिसत नाही. त्यात महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांना २१ जागा मिळाल्या आहे. पण, या सर्व आघाडीचा कल बघता राज्याला विरोधी पक्षनेतेपद मिळेल की नाही असा प्रश्न आता तयार झाला आहे. असे झाले तर राज्यात प्रथमच विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद नसणार आहे. त्याला कारण घटनेतील एक नियम आहे.
असा आहे तो नियम
लोकसभा असो की राज्याची विधानसभा असो विरोधीपक्षनेतेपद मिळण्यासाठी त्या पक्षाला एकूण जागांचा दहा टक्के जागा मिळणे आवश्यक आहे. आताची परिस्थिती पाहिली तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस २०, शिवसेना उबाठा १९ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १३ जागा मिळत आहे. तिघांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी २८ चा जादूई आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे राज्यात आता विरोधीपक्षनेतेपद नसणार आहे.