इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विधानसभेच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीच्या पहिला पोस्टल मतांचा कल समोर आला आहे. २८८ जागांपैकी २८८ जागांचा कल हाती आला असून त्यात महायुती आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर महाविकास आघाडीने काहीशी पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. पोस्टल मतात महायुतीच्या भाजपला ९३, शिवसेना शिंदे गट ३० , राष्ट्रवादी अजित पवार गटाला २५, अशा एकुण १४८ जागेवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस ४५ शिवसेना ठाकरे गट ३६, राष्ट्रवादी शरद पवार गट ४६ अशा एकुण १२७ जागेवर आघाडी मिळाली आहे. तर इतर पक्ष १३ जागेवर आघाडी मिळाली आहे.
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू कल बाहेर येऊ लागला आहे. पोस्टल मतात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे समोर आल्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतमोजणीत अजित पवार हे बारामतीतून पिछाडीवर होते. त्यानंतर मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पुन्हा अजित पवार आघाडीवर असल्याचे चित्र होते.