बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

निवडणुक निकालाआधी जुळवाजुळव सुरू बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्यासाठी मोहीम; हेलिकॉप्टरची व्यवस्था

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 22, 2024 | 6:42 pm
in संमिश्र वार्ता
0
neta

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आधाच राजकीय गोटातही मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. महायुती आणि माहविकास आघाडी यांच्याकडून आता अपक्ष, बंडखोर यांच्याशी संपर्क साधला जात आहे. दरम्यान, एकीकडे सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागलेली असताना दुसरीकडे राजकीय पक्षाचे बैठकांचे सत्रही चालू झाले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे हे आपापल्या पक्षातील नेतेमंडळीशी संवाद साधत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पक्षाच्या प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. याबाबत शिंदे उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले आहे. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झाले? हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात? मतमोजणी संपताना सी-१७ फॉर्मवरील माहिती काय होती आणि मतमोजणी वेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे, हे तपासण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

या बैठकीत महाविकास आघाडी १५७ जागांपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. असे असले तरी प्रत्यक्ष निकाल काय लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीची सरकार येणार, की महायुतीची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. शनिवारी निकाल लागण्यापूर्वी शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत मतमोजणी विषयी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती मिळाली. सोबतच महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार याबाबतची उमेदवारांना सांगितल्याची माहिती आहे.

राज्य विधानसभा निवडणुकीचे ‘एक्झिट पोल’ जाहीर झाले असून महायुती आणि महाआघाडी या दोघांनाही बहुमताचा १४५ हा जादुई आकडा गाठणे अवघड असल्याचे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसने हमखास निवडून येणाऱ्या आपल्या बंडखोरांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यावर काँग्रेसच्या पदरात १०१ जागा पडल्या. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. यात रामटेक मतदारसंघातील बंडखोर राजेंद्र मुळक आणि सोलापूरचे धर्मराव काडादी हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या बंडखोरांशी संपर्क साधला आहे. आबा बागुल, सुरेश जेथलिया, मनीष आनंद, कल्याण बोराडे, जयश्री पाटील, अविनाश लाड या अपक्ष निवडणूक लढलेल्या उमेदवारांशी काँग्रेसने संपर्क साधला आहे. राहुल मते या बंडखोरांना सहा वर्षांसाठी काँग्रेसने निलंबित केले आहे, तरीही या त्यांच्याशी संपर्क झाला आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसच्या बंडखोरांशी महायुतीचे नेतेही संपर्क साधत आहेत. इतरही बंडखोरांना काँग्रेस नेत्यांचे फोन गेले आहेत. रामटेक ही जागा महविकास आघाडीत ठाकरे गटाच्या वाट्याला गेली होती. तेथे काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. काँग्रेसची पूर्ण संघटना त्यांचा प्रचार करत होती. ते निवडून येतील, असे काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.

भाजप महायुतीची बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर असणार आहे. बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपने जबाबदारी वाटून दिली आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रमुख नेत्यांकडून आढावा घेतला. बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड , प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आणि चित्रा वाघ उपस्थित होत्या. प्रत्येक नेत्याला एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय मंगलप्रभात लोढा, भूपेंद्र यादव आणि पराग शाह, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, मिहिर कोटेचा हे नेतेदेखील उपस्थित होते. उद्या मतमोजणीनंतर मुख्यमंत्र्यांचे गणित जुळवण्यासाठी भाजपचे सगळे नेते, पदाधिकारी आणि उमेदवार सागर बंगल्यावर उपस्थित होते. विशेष म्हणजे मनसेचे बाळा नांदगावकर देखील सागर बंगल्यावर दिसून आले.

दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचे सांगितले; मात्र त्यांना शेवटपर्यंत एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला. वास्तवात ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आमचा पाठिंबा अपक्ष उमेदवार काडादी यांना असल्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळ आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भिवंडीतील तीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

Next Post

रस्त्याने पायी जाणा-या महिलेचा दुचाकीस्वारांनी केला विनयभंग

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250901 WA0417
महत्त्वाच्या बातम्या

ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध, आजपासून राज्यभर उपोषणे आणि आंदोलने

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

सप्टेंबर 2, 2025
fire 1
क्राईम डायरी

धक्कादायक….कौटूंबिक वादातून मुलाने आईवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले

सप्टेंबर 2, 2025
image002EJ0W
महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे आणि स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी झाला हा मोठा करार….

सप्टेंबर 2, 2025
crime1
क्राईम डायरी

चर्चच्या फादरसह अन्य दोघांवर टोळक्याचा हल्ला…जत्रा हॉटेल भागातील घटना

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाच दिवस…कोर्टाच्या आदेशानंतर ही आहे स्थिती

सप्टेंबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना काही आर्थिक समस्या त्रासदायक ठरतील, जाणून घ्या, मंगळवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 2, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
Next Post
rape

रस्त्याने पायी जाणा-या महिलेचा दुचाकीस्वारांनी केला विनयभंग

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011