मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रविवारी सर्वत्र राजकीय घडामोडी झाल्या. महायुती व महाविकास आघाडीने बंडोबांना थंड करण्यासाठी जोररदार फिल्डींग लावली. तर स्थानिक पातळीवर आपल्याला गैरसोयीचे होणा-या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले.
माघार घेण्यासाठी ठिकठिकाणी मोठी सौदेबाजी झाल्याचेही वृत्त आहे. काहींना पदाचे तर काहींना पैशाचे आमिष दाखवण्यात आले. तर काही ठिकाणी दमही भरण्यात आला. उद्या दुपारपर्यंत ही माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी १५ ते ३० उमेदवार रिंगणात आहे. काही ठिकाणी मुख्य उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांचे अर्ज दाखल केले. ते सुध्दा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची काही संख्या कमी होणार आहे.