नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघातून ३६१ उमेदवारांनी ५०६ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. सर्वाधिक ३४ उमेदवार हे नांदगाव मतदार संघात आहे. तर सर्वात कमी १६ उमेदवार हे कळवण मतदार संघात आहे. या निवडणुकीत अखेरच्या दिवसांपर्यत हे अर्ज दाखल झाले असून आता आज छाननीमध्ये यातील काही अर्ज कमी होतील. तर ४ नोव्हेंबर रोजी माघारीच्या दिवशी यातील एकुण रिंगणात असलेली उमेदवारांची संख्या समोर येणार आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी व महायुतीने सर्वच मतदार संघात उमेदवार रिंगणात उतरवले आहे. तर मनसेने सहा उमेदवार दिले आहे. इतर राजकीय पक्षांची संख्या कमी आहे. पण, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणा-यांची संख्या जास्त आहे.
इतक्या उमेदवारांनी भरले अर्ज
नांदगाव – ३४
मालेगाव मध्य -१८
मालेगाव बाह्य – ३२
बागलाण – २६
कळवण – १६
चांदवड – २२
येवला – ३१
सिन्नर – २२
निफाड – १९
दिंडोरी – २३
नाशिक पश्चिम-१९
नाशिक मध्य-२२
नाशिक पूर्व – २२
देवळाली – २४
इगतपुरी – ३१