मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने बैठकांचा सपाटा लावत मतदारसंघांसह उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. मात्र, अशातच आता निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.यात रावेर, शिंदखेड राजा,वाशिम ,धामणगाव रेल्वे,नागपूर दक्षिण मध्य, साकोली,नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव,खानापूर या जागांचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व मतदारसंघ पुढीलप्रमाणे
१) शमिभा पाटील – रावेर
२) सविता मुंढे – शिंदखेड राजा
३) मेघा किरण डोंगरे – वाशिम
४) निलेश विश्वकर्मा – धामणगाव रेल्वे
५) विनय भागणे – नागपूर दक्षिण मध्य
६) डॉ. अविनाश नान्हे – साकोली
७) फारुख अहमद – नांदेड दक्षिण
८) शिवा नारांगले – लोहा
९) विकास रावसाहेब दांडगे – छत्रपती संभाजीनगर पूर्व
१०) किसन चव्हाण – शेवगाव
११) संग्राम कृष्णा माने – खानापूर