मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मुख्य लढत होणार आहे. या दोन्ही आघाडीत एकुण सहा पक्ष असून त्यामुळे कोणता पक्ष किती जागा लढवेल हे अद्याप अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी आता त्याचे आकडे समोर आले आहे.
महाविकास आघाडीने अगोदर ८५-८५-८५ चा फार्म्युला ठरवला होता. पण, आता त्यात पाचने वाढ होणार आहे. त्यामुळे आता ९०-९०-९० असा फॅार्म्युला ठरवण्यात आला आहे. तर मित्रपक्षांना १८ जागा दिल्या जाणार आहे. या आघाडीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी पवार गट व काँग्रेसचा समावेश आहे. समसमान जागा वाटप झाल्यास कोणी छोटा व कोणी मोठा पक्ष राहणार नाही.
दुसरीकडे महायुतीचे जागा वाटपही अधिकृतपणे अद्याप जाहीर केलेले नाही. पण, महायुतीच्या नेत्यांच्या बोलण्यात आता हेही आकडे समोर आले आहे. २८८ जागांपैकी महायुतीत भाजप १५६ जागा तर शिवसेना शिंदे गट ७८ तर राष्ट्रवादी अजित पवार गट ५४ जागा लढवणार असल्याचे समोर आले आहे.