मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडिया टुडे – सी व्होटर्सच्या मुड ऑफ नेशनचा सर्वे समोर आला असून त्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १५० ते १६० जागा मिळू शकतात. तर महायुतीला १२० ते १३० जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मतांच्या टक्केवारी महायुतीला ४३ टक्के तर महाविकास आघाडीला ४४ टक्के मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या अगोदर झीचा सर्व्हे आला होता. त्यात महायुतीला पसंती देण्यात आली होती. पण, हा सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने यश मिळवले होते. विधानसभेच्या निवडणुकीतही हाच कित्ता मतदार गिरवणार असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे.
खरं तर हा सर्व्हे आज निवडणुका झाल्या तर काय होईल असा आहे. पण, विधानसभा निवडणुकीसाठी अजून तीन महिने बाकी आहे. त्यात किती पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात महायुती व महाविकास आघाडी ही शेवटपर्यंत टिकेल का हा प्रश्न सुध्दा आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीत होणारी बंडखोरी मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल काय लागेल हे आता सांगणे तसे धाडसाचे आहे.