नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात मंगळवार २२ ऑक्टोबर पासून ते २९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांची दखल घ्यावी, असे आवाहन निवडणूक अधिका-यांनी केले आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र प्राप्त करणे आणि दाखल करणे- 22 ते 29 ऑक्टोबर 2024,
वेळ – सकाळी 11 ते दुपारी 3 (सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता)
दाखल करावयाचे ठिकाण- संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय,
नामनिर्देशन पत्रांची छाननी-
30 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात,
उमेदवारी अर्ज मागे घेणे-
4 नोव्हेंबर 2024 (सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत), संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात,
मतदानाचा दिनांक व वेळ-
20 नोव्हेंबर 2024, वेळ – सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत,
मतमोजणीचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2024.