इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आप दोन, भाजप, काँग्रेस व तृणमूल काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे आपने गुजरातमध्ये भाजपच्या गडात एक जागा जिंकली तर दुसरी जागा पंजाबमधील आहे. भाजपने गुजरात, काँग्रेस केरळ तर तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालच्या जागेवर आघाडीवर आहे.
पंजाब, गुजरात, केरळ व पश्चिम बंगाल या चार राज्यात या पोटनिवडणुका पाच जागेसाठी झाल्या. त्यात गुजरातमध्ये दोन जागा होत्या तर केरळ, पंजाब व पश्चिम बंगाल येथे प्रत्येकी एक जागा होती. पश्चिम लुधियानात आम आदमी पार्टीच्या समोर काँग्रेस व भाजपचे उमेदवार होते. या तिरंगी निवडणुकीत आपचे उमेदवार संजीव अरोरा यांनी आघाडी घेतली आहे. ते राज्यसभेचे खासदार आहे. त्यांच्या आता रिक्त जागेवर अरविंद केजरीवाल यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे.
गुजरातमध्ये कडी विधानसभा मतदार संघात भाजपचे राजेंद्र कुमार छाबडा हे विजयी झाले. तर विसावदार विधानसभा मतदार संघात आपचे गोपाल इटालिया यांनी बाजी मारली. केरळमध्ये काँग्रेसचे आर्यदन शौकत आघाडीवर आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आलिफा अहमद या आघाडीवर आहेत.