मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचे विशेष अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर दरम्यान होणार आहे. त्यासाठी कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली. आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ दिली.
या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येणार आहे. ही शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचा-यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ९ डिसंबेरला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.
त्यानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे.