पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीतर्फे काही मतदार संघातील उमेदवारी घोषीत केल्यामुळे चित्र स्पष्ट झाले असले तरी अजूनही काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जाहीर झालेले नाही. तर भाजप व अजित पवार गटाने आपले उमेदवार काही मतदार संघात उमेदवार जाहीर केले नाही. त्यामुळे १५ विधानसभेचे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. येत्या एक दोन दिवसात हे चित्र स्पष्ट होईल.
नाशिक मध्य – वसंत गिते (ठाकरे गट) – भाजपचा उमेदवार जाहीर नाही
नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप) – सुधाकर बडगुजर (ठाकरे गट) दिनकर पाटील (मनसे)
नाशिक पूर्व – राहुल ढिकले (भाजप) – राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार जाहीर नाही
देवळाली – सरोज अहिरे (अजित पवार गट) – राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार जाहीर नाही
चांदवड – डॅा. राहुल आहेर (भाजप) – उदय आहेर (अपक्ष) – काँग्रेसचा उमेदवार जाहीर नाही
मालेगाव मध्य – तीन्ही पक्षाचे उमेदवार जाहीर नाही
मालेगाव बाह्य – दादा भुसे (शिंदे गट) – अव्दैय हिरे (ठाकरे गट)
नांदगाव – सुहास कांदे (शिंदे गट) – गणेश धात्रक (ठाकरे गट) – समीर भुजबळ (निर्णय बाकी)
येवला – छगन भुजबळ (अजित पवार गट) – उमेदवार जाहीर नाही
निफाड – अनिल कदम (ठाकरे गट) – राष्ट्रवादी अजित पवार गट
दिंडोरी – नरहरी झिरवाळ (अजित पवार गट) – शरद पवार गट
कळवण – नितीन पवार (अजित पवार गट) – माकप जे.पी. गावित
इगतपुरी – हिरामण खोसकर (अजित पवार गट) – काँग्रेस उमेदवार जाहीर नाही
सिन्नर – माणिकराव कोकाटे (अजित पवार गट) – उदय सांगळे (शरद पवार गट निश्चित)
सटाणा – दिलीप बोरसे (भाजप ) – राष्ट्रवादी शरद पवार गट