इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उध्दव ठाकरे यांना दिलेल्या थेट जाहीर ऑफरची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप २०२९ पर्यंत नाही, मात्र तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप असल्याचे सांगीतले. या वक्तव्यामुळे आता तर्कवितर्क लढवले जात आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा आज शेवटचा दिवस होतो. त्यांच्या निरोप समारंभानिमित्ताने बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही ऑफर दिली. त्या आधी या दोन्ही नेत्यांची सभागृहाबाहेरही भेट झाली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले उध्दवजी आता २०२९ पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप २०२९ पर्यंत नाही, मात्र तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पध्दतीने विचार करता येईल आपण वेगळ्या पध्दतीने बोलू असेही त्यांनी सांगितले.