मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विधानभवनात नूतनीकरण करण्यात आलेल्या विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री महोदय व विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
