इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सात जणांच्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. १२ जणांची नावे पाठवायची असतांना सात जणांची यादी पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यात ३-२-२ असा फॅार्म्युला वापरण्यात आला आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची दोन नावे पुढे आले असून त्यात नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पंकज भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विभागाचा चेहरा म्हणून इद्रिस नाईकवाडी यांना संधी दिली आहे.
भाजपने तीन जागेवर चित्रा वाघ, विक्रांत पाटील, मुखेडचे आमदार तुषार राठोड यांना संधी दिली. तर शिवसेना शिंदे गटाने मनिषा कायंदे, हेमंत पाटील यांना संधी दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच विधान परिषदेत हे सात जण आमदार होणार आहे.
नांदगावमध्ये संघर्ष टळणार
अजित पवार गटाने पंकज भुजबळ यांना संधी दिली आहे. पंकज भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदार संघातून दोन वेळेस आमदार झाले. पण, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेचे सुहास कांदे यांनी १४ हजार मतांनी या मतदार संघातून विजयी झाले. महायुतीत कांदे हे शिंदे गटाकडून उमेदवार आहे. त्यामुळे पंकज भुजबळ यांची अडचण होणार असल्यामुळे अजित पवार गटाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.









