लंडन (ब्रिटन) – ‘कोरोना’ या शब्दाने गेल्या दोन वर्षात संपूर्ण मानव जातीमध्ये भीतीच्या आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाचा संसर्ग जगभरातील अनेक देशात पसरला असताना गेल्या काही दिवसात यूरोपमध्ये मात्र त्याचा अधिक प्रादुर्भाव जाणून दिसून येतो. सहाजिकच येथील अनेक देशांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या संदर्भातील एका प्रकरणावरून इंग्लंडच्या संसदेत मात्र मोठी खळबळ उडाली आहे. एक व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर संपूर्ण ब्रिटनमध्ये अशी खळबळ उडाली आहे. यावर देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माफी मागितली आणि त्यांच्या सल्लागारानेही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
त्याचे असे झाले की, गेल्या वर्षी डाऊनिंग स्ट्रीटवर ख्रिसमस पार्टीच्या वेळ पंतप्रधानांचे वरिष्ठ सहकारी कोविड-19 महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनची खिल्ली उडवत आहेत. असा एक व्हिडिओ सापडला. आणि तो व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर देशातील जनता संतापली आहे.
https://twitter.com/PaulBrandITV/status/1468285179919749120?s=20
विशेष म्हणजे बोरिस जॉन्सनचे सहयोगी अधिकारी देशातील लॉकडाऊन आणि कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची खिल्ली उडवत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर विरोधी मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
व्हिडिओसह स्टारमर यांनी ट्विट केले की, देशभरातील नागरिकांनी नियमांचे पालन केले, याचा अर्थ ते नातेवाईक व प्रियजनांपासून वेगळे होते. तसेच नागरिकांची अपेक्षा होती की, सरकार देखील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहे.’ मात्र ‘खोटे बोलणे आणि त्या खोट्या गोष्टींवर हसणे हे लाजिरवाणे आहे. आपल्या देशात असे पंतप्रधान आहेत, सामाजिकदृष्ट्या सत्यापासून ते दूर जात आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या संसर्गाची 101 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, ज्यासह या प्रकरणांची संख्या 437 वर पोहोचली. तसेच या नवीन प्रकाराबाबत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.