बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अंभोरा येथे वैनगंगा नदीवर साकारणार हा भव्य प्रकल्प; पर्यटकांना मिळणार या सर्व सुविधा

नोव्हेंबर 13, 2022 | 12:14 pm
in संमिश्र वार्ता
0
ambhora1

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर -उमरेड मार्गावर असणाऱ्या अंभोरा या प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करण्याकरिता सिंचन विभागातर्फे 200 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असून गोसीखुर्द बॅकवॉटर मध्ये कॅप्सूल लिफ्ट , हॉटेलिंग , क्रूज टुरिझम , जेट्टी प्रवास , जलपर्यटन यासारख्या उपक्रमातून अंभोरा हे जागतिक दर्जाचे आकर्षण असणारे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल. या पर्यटन प्रकल्पामुळे येथील 2,000 तरुणांच्या हातांना काम मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण -एनएचएआय द्वारे नागपूर उमरेड या राष्ट्रीय महामार्ग – 353 डी च्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते उमरेड बायपासजवळील योग भवन येथे आयोजित कार्यक्रमात झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमरेडचे आमदार राजू पारवे प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर -उमरेड हा चौपदरीकरण झालेला रस्ता 41 किलोमीटर लांब असून यासाठी 782 कोटी रुपये खर्च आलेला आहे. उमरेड ते नागपूर हा रस्ता ‘ग्रीन रोड ‘ म्हणून तयार करण्यासाठी एनएचएआय तर्फे रस्त्याच्या 3 मीटर अंतरापर्यंत वृक्षारोपण करण्यात येणार आहे . या मार्गामुळे नागपूर बरोबरच उमरेड भिवापूर ,आरमोरी या ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे . या रस्त्यामुळे कोळसा, कृषीमाल यांची वाहतूक सुलभरीत्या होणार असून यामुळे येथील उद्योग विकासाला चालना मिळणार आहे .हा महामार्ग विकासाचा ठरणार असून यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. उमरेड , भिवापूर , कुही या ठीकाणी आर्थिक संपन्नता येईल असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे तलाव खोलीकरणाच्या कामातून रस्त्यांचे दर्जेदार कामे पश्चिम विदर्भात झाली . त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यात सुद्धा मांगली , हळदगाव, वडेगाव , उकडवाही पांढराबोडी या सहा तलावातून खोलीकरण झाल्याने उमरेड भागातील शेतकऱ्यांना 1 लाख 672 क्युबीक मीटर एवढा जलसाठा उपलब्ध झाला असून यातून सिंचन व पेयजलाची सुविधा निर्माण होणार आहे . अशी माहिती गडकरी यांनी दिली . उमरेड शहरासोबतच उमरेड -भिवापूर या रस्त्याचे चौपदरीकरण सुद्धा आपण करू . उमरेड ते बुटीबोरी या रस्त्याकरिता केंद्रीय रस्ते निधीतून 20 कोटी रुपये देऊ.

असे आश्वासन त्यांनी दिले . नागपूर -उमरेड – वडसा – चंद्रपूर – गोंदिया या मार्गावरील ब्रॉडगेज मेट्रोच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून या कामाला सुद्धा काही महिन्यात प्रारंभ होईल . 140 किलोमीटर प्रति तास या ब्रॉडगेज मेट्रोचा वेग असून नागपूर ते उमरेड हे अंतर केवळ 25 मिनिटात पार करणे शक्य होईल असेही त्यांनी सांगितले. उमरेड ते नागपूर या चौपदरी रस्त्यावर रस्ता सुरक्षा च्या हेतूने सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केले.

https://twitter.com/nitin_gadkari/status/1591492811186061312?s=20&t=NEGH_apsYkz7Uc5D24dgbg

याप्रसंगी उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमरेड ते नागपूर हा एक आधुनिक आणि गतिशील असा रस्ता असून रस्ते हे विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात विकासात कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते असे त्यांनी सांगितले .नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला गडचिरोली , गोंदीया पर्यंत आपण नेणार आहोत . याचे उद्घाटन सुद्धा जानेवारीत करू असे त्यांनी सांगितले . नागपूर ते गोवा दरम्यानचा रस्ता मराठवाडा कोल्हापूर या भागातून जाणारा एक्सेस कंट्रोल रोड असल्याने . या भागात लॉजिस्टिक हब उदयास येतील . अंभोरा येथील पर्यटन केंद्र तयार करण्याच्या उद्देशाने नियामक समितीच्या बैठकीत 200 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला देऊन पर्यटनाचे मोठे सर्किट या ठिकाणी आपण तयार करू असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी उमरेड तालुक्यातील ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प ,शहरातील रस्त्यांना बाह्य वळण रस्ताजोड , भिवापूर रस्ता , कुही ते बुटीबोरी रस्ता , अंभोरा पर्यटन स्थळ या प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देण्या संदर्भात लक्ष वेधले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नागपूर तसेच उमरेड जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, उमरेड भिवापूर , कुही येथील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://twitter.com/nitin_gadkari/status/1591421375528730625?s=20&t=NEGH_apsYkz7Uc5D24dgbg

Vidarbha Ambhora Water Project Tourism Destination

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्याहून आता थेट बँकॉक विमानसेवा; असे आहे वेळापत्रक

Next Post

पुण्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी गुडन्यूज; आता मिळणार ही सेवा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

पुण्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी गुडन्यूज; आता मिळणार ही सेवा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011