जयपूर (राजस्थान) – बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या विवाह सोहळा कालपासून सुरू झाला असून आज हळदीचा कार्यक्रम होणार आहे. अत्यंत भव्यदिव्य आणि आकर्षक असलेल्या या लग्नसमारंभात कालपासून संगीत सोहळ्याने धमाकेदार सुरुवात झाली आहे.
कतरिना आणि विकीच्या लग्नाचे विधी राजस्थानमधील सिक्स सेन्स, फोर्ट बरवाडा येथे पार पडत आहेत. काल रात्री या जोडप्याचा संगीत सोहळा सुरू झाला आहे. सध्या बरवडा किल्ल्याच्या बाहेरून समोर आलेले दोन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे दोन व्हिडिओ पाहून कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या चाहत्यांचा उत्साह प्रचंड वाढला आहे. (बघा खालील व्हिडिओ)
https://www.instagram.com/tv/CXMIb5xLu8B/?utm_source=ig_web_copy_link
यातील पहिल्या व्हिडिओमध्ये, रेझरच्या लाईटने उजळून निघालेल्या बरवडा किल्ल्याचे सौंदर्य दृष्टीक्षेपात आणले जात आहे. तसेच या व्हिडिओमध्ये हृतिक रोशनच्या ‘वॉर’ चित्रपटातील ‘घुंगरू’ हे गाणे वाजवले जात आहे. हा व्हिडीओ पाहून हे स्पष्ट होते की, सोहळ्याच्या सुरुवातीपासूनच प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये बरवारा किल्ल्याजवळ काही जण फटाक्यांची आतषबाजी करताना दिसत आहे.
संगीत समारंभात कतरिना कैफचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरचे एकही गाणे वाजवले जाणार नाही, असा दावाही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. तसेच चुकूनही रणबीरच्या चित्रपटाशी संबंधित कोणतेही गाणे वाजवले जाऊ नये, याची इव्हेंट मॅनेजर्सना चांगलीच जाणीव आहे. तसेच हा संगीत सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी विकी कौशल आणि कतरिना कैफ गेल्या अनेक आठवड्यांपासून कसून सराव करत आहेत. (बघा खालील व्हिडिओ)
‘सिंग इज किंग’ चित्रपटातील ‘तेरी ओरे’ या रोमँटिक गाण्यावर हे जोडपे आज रात्री डान्स करणार आहेत, असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. याशिवाय ही जोडी आणखी काही रोमँटिक गाण्यांवर परफॉर्म करणार आहे. मात्र कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित पाहुणे त्यांना आलेला फोन घेऊ शकत नाहीत. याच कारणामुळे, संगीत सोहळ्याचे आतील फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर लीक होण्याची शक्यता कमी आहे.
तसेच विकी आणि कतरिनाच्या पाहुण्यांसाठी बनवलेल्या वेलकम नोटचा ( सूचनांचा ) एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, पाहूण्यांनी हॉटेलच्या खोलीतच आपले फोन ठेवून द्यावेत. त्यामुळे या विवाह सोहळ्यात नेमके काय घडते याबाबत सविस्तर माहिती होत नसली तरी काही प्रमाणात व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने हा भव्यदिव्य सोहळा रसिकांना काही प्रमाणात अनुभवता येतो आहे. (बघा खालील व्हिडिओ)