मुंबई – बॉलिवूडची सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ सध्या अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधत आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचे विधी आजपासून सुरू झाले आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ बराच काळ एकमेकांना डेट करत होते, पण त्यांनी या पुर्वी कधीच त्यांच्या नात्याची घोषणा केली नाही. मात्र आता विकी-कतरिनाच्या लग्नादरम्यान, अभिनेत्री आणि अभिनेत्याची एकूण संपत्ती तसेच एकूणच जीवनशैली प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
विकीपेक्षा वयाने मोठी
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या वयात पाच वर्षांचा फरक आहे. कतरिना तिचा भावी पती विकीपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. कतरिनाचे वय ३८ वर्षे आहे, तर विकीचे वय ३३ वर्षे आहे. म्हणजेच पतीपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्टार्सच्या यादीत कतरिना कैफचेही नाव समाविष्ट होणार आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण
वयाच्या शिवाय कतरिनाची सिनेमॅटिक कारकीर्दही विकीच्या सिनेमापेक्षा मोठी आहे. कतरिनाने सन २००३ मध्ये बूम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, म्हणजेच तिने बॉलिवूडमध्ये १८ वर्षे पूर्ण केली आहेत. तर दुसरीकडे, विकी कौशलने २०१२ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून त्याला ९ वर्ष झाले आहे.
कतरिनाची एकूण संपत्ती
कतरिना कैफची एकूण संपत्ती २२४ कोटी रुपये आहे आणि ती एका चित्रपटासाठी ११ कोटी रुपये घेते. यासोबतच कतरिना कैफ ‘के ब्युटी’ या ब्युटी ब्रँडची मालकही आहे. यासोबतच कतरिनाने न्याकामध्ये ४ कोटी रुपये गुंतवले होते, त्यानंतर आता तिला २४ कोटी रुपये मिळाले आहेत. कतरिना कैफकडे ४ लक्झरी कार आहेत. यामध्ये रेंज रोव्हरपासून ऑडीपर्यंतच्या कारचा समावेश आहे.
विकीची निव्वळ संपत्ती
विकीची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे. त्याचवेळी एका चित्रपटाचा विकी ४ कोटी रुपये घेतो. विकीला ब्रँड एंडोर्समेंटसाठी २ कोटी रुपये मिळतात. विक्कीला ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली.
आगामी चित्रपट
विशेष म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. दुसरीकडे, कतरिना कैफ ही सलमान खानसोबत ‘फोन भूत’, ‘जी ले जरा’ आणि ‘टायगर 3’मध्ये दिसणार आहे. यासोबतच विकी कौशल हा ‘गोविंदा मेरा नाम’, ‘द अमर अश्वथामा’, ‘तख्त’ आणि ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’मध्ये दिसणार आहे.